अहेरी – पत्रकार संघटनेच्या वतीने अहेरी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात कठोर कारवाईची मागणी निवेदन देऊन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने जळगाव येथील पत्रकार संदीप जगताप यांच्या वरील हल्ल्याचा निदर्शने करून निषेध करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वृत्तवाहिनीने धडाडीचे पत्रकार संदीप महाजन यांच्या वर आ.किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. लोकशाही चा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारितेवर हा हल्ला म्हणजे पत्रकारितेचे मुस्कटदाबी आहे.
आ. किशोर पाटील आणि त्यांच्या हल्लेखोर समर्थकांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी अशी आम्ही मागणी करतो आहो. पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती.. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती..
ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते.. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती.. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली.. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती..
संदीप महाजन आज रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला..नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो.. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली गेली..
महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत.. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे. सत्य बातमी देणारया पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना पत्रकार संघटनेचे अहेरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड,सचिव अनिल गुरनुले, प्रशांत ठेपाले,रमेश बामनकर,अखिल कोलपाकवार,आनंद दहागावकर,महेश गुंडेट्टीवार,जावेद अली,विस्तारी गंगाधरीवार, रामू मादेशी,अमोल कोलपाकवार,उमेश पेंड्याला, आसिफ पठाण, स्वप्निल तावडे, स्वप्नील श्रीरामवार आदीची उपस्थिती होती.