Tuesday, September 17, 2024
Homeराज्यभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा…

अमरावती – जातीनिहाय जनगणना करा, आरक्षणाची ५०% मर्यादा उठविण्यासाठी संसदेत कायदा करा व जनतेच्या मुलभूत प्रश्नाची सोडवणूक करा , व इतर स्थानिक मागण्यांना घेवून आज ३० ऑगस्ट रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती . या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी , मजुर ,कामगार , विद्यार्थी ,युवक , महिलांचा विशाल मोर्चा काढण्यात आला.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन ) येथून पक्षाचे राष्ट्रीप कौंसिल सदस्य व जेष्ठ नेते कॉ. तुकाराम भस्मे , पक्षाचे जिल्हा सचिव कॉ सुनिल मेटकर, पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ.अशोक सोनारकर आयटकचे जिल्हा अध्यक्ष कॉ. जे .एम . कोठारी , बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सचिव कॉ संजय मंडवधरे यांचे नेतृत्वात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली.

केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करीत आहे. सर्व वंचित जात समुहांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षण , नोकरी , व देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात योग्य स्थान देण्या करिता देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होत.

सर्व कष्टकरी समुहाचे प्रश्न तिव्र झाले आहे मात्र केंद्र व राज्य सरकार मुस्लीम व्देषाचा अजेंडा राबवून भारतीय समाजामध्ये धार्मिक फुट पाडण्याचे काम करीत असल्याचे मत पक्षाचे पक्षाचे नेते कॉ तुकाराम भस्मे यांनी मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केले . मोर्चाला पक्षाचे जिल्हा सचिव कॉ . सुनिल मेटकर , ग्रा. पं . कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव कॉ . निळकंठ ढोके , महिला फेडरेशनच्या ॲड. क्रांती देशमुख , कॉ चित्रा वंजारी , किसान सभेचे कॉ . सतिश चौधरी , प्रा अरविंद वानखडे , अंगणवाडी युनियनच्या कॉ .मिरा कैथवास , बांधकाम कामगार संघटनेचे कॉ . संजय मंडवधरे .आशा वर्कर संघटनेचे कॉ .प्रफुल देशमुख , एआयएसएफ च्या जिल्हा सचिव कॉ.प्रतिक्षा ढोके ,

उमेश बनसोड यांनी मोर्चाला संबोधित केले .मोर्चामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी ,मजुर ,कामगार , महिला , विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . जातीनिहाय जनगणना करा . स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून सर्व पिकांसाठी हमीभावाचा कायदा करा.

सर्व कष्टकरी कामगार शेतकरी मजुरांसाठी पेंशनचा कायदा करा . घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान द्या . स्मार्ट मिटर योजना रद्द करा . अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या . कापूसला १० हजार ,सोयाबीनला ७ हजार भाव देवून सरकारी खरेदी केंद्र सुरु करा.

महिलावरील वाढत्या लैंगिक अत्याचाराला आळा घाला व आरोपींना फाशीची शिक्षा दया . अंगणवाडी ,आशा , ग्रामपंचायत कर्मचारी ,शालेय पोषण आहार कर्मचारी , घरकामगार मोलकरीण ,बांधकाम कामगार यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढा .वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा .शेती कुंपणासाठी अनुदान द्या .धन्या ऐवजी पैसे योजना रद्द करा, सर्वांना अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत रेशन द्या.मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करा व शेती कामाचा समावेश मनरेगा मध्ये करा.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा व शेतीपंपाचे थकित वीज बिल माफ करा.वनाधिकार कायद्याअंतर्गत आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनीचे वाटप करा.आरोग्यवस्थेचे खाजगीकरण रद्द करा .आरोग्यवस्थेतील रिक्त पदाची त्वरित भरती करा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरा स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार व भ्रष्टाचार बंद करा.

सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या व सामाजिक सुरक्षा लागू करा . किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करा .सार्वजनिक उद्योग व सरकारी उद्योगातील रिक्त जागा त्वरित भरा . बेरोजगारीला आळा घाला . बांधकाम कामगारांच्या नोंदणीतील अडचणी दूर करा . सन २३ – २४ करिता पिक विमा नुकसान भरपाई द्या व पिक विमा क्षेत्रातून खाजगी कंपन्या हद्दपार करून सरकारी पिक विमा कंपनीची स्थापना करा . सोयाबीन कापूस अनुदान वाटप योजनेतील ई पिक पाहणीची अट रद्द करा . इत्यादी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

मोर्चामध्ये सागर दुर्योधन , डॉ . ओमप्रकाश कुटेमाटे , चंद्रकांत बानुबाकोडे, विनोद जोशी , चंद्रकात वडस्कर, प्रा .विजय रोडगे , लताताई सोनारकर , सुनिल घटाळे , कैलाश ठाकरे , धनंजय मस्के, एम .वाय . शहाणे , ज्ञानेश्वर मेश्राम , जयेंद्र भोगे , बापुराव बाळापुरे, संतोष सुरजुसे, संजय हाडके , अर्चना भांडवलकर , इंदूताई बोके , लक्ष्मणराव धाकडे ,

प्रकाश सोनोने , कैलाश महाजन , शरद मंगळे,संजय मंगळे , महेश जाधव ,रेखा मोहोड , विश्वास कांबळे, विनोद तरेकर नारायण भगवे ओमप्रकाश सावळे , प्रज्ञा बनसोड , रेखा हिंगवे , वैशाली निस्वादे सलीम खाँ , कैलाश महाजन , शरद मंगळे ,राजाभाऊ बाभूळकर , राहूल मंगळे , प्रकाश कुरेकर , शाहीर धम्मा खडसे , बाबाराव दाहिजे ,नंदू नेतनराव , प्रज्वल ढोके सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: