शहराच्या उन्नतीसाठी सामूहिक प्रयत्नांतून विकासाला गती देऊ – आ. सुलभा खोडके…
अमरावती – मराठा सेवा संघाचे मार्फत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद, शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद असे ३३ कक्ष चालविले जातात. स्थानिक कार्यकारिणीचे वतीने संपूर्ण वर्षभर राबविले जाणारे उपक्रम हे समाजाच्या उन्नतीसाठी व हितसंवर्धनासाठी साधक ठरणारे आहे.
आपल्या विजयात मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचाही मोलाचा वाटा आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून कार्यातून आज सर्वच क्षेत्रात समाज बांधव व भगिनी आपल्या कार्यकुशलतेने उद्योग, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, शैक्षणिक, सहकार, क्रीडा, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक, साहित्य, वाणिज्य, विधी, वाणिज्य, प्रशासन, वैद्यकीय आदींसह विविध क्षेत्रात तसेच देश-विदेशात आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवीत आहे.
शहरातील विविध चौकांना थोर महापुरुषांची नावे दिल्याने आता सुसंस्कारित चौक अशी ओळख झाली आहे. शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौक, शिवटेकडीचे सौंदर्यीकरण याकरिता आपण पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आ. सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ अंतर्गत ३८-अमरावती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आ. सुलभा खोडके यांनी विजय संपादन केला. तदहेतु मराठा सेवा संघाचे अमरावती कार्यकारिणीचे वतीने त्यांच्या गाडगे नगर स्थित निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिजाऊ बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरविंद गावंडे व अन्य सहकारी यांच्या वतीने नवनिर्वाचित आ. सुलभा खोडके यांचा पुष्पगुच्छ देऊन स्नेहील सत्कार करण्यात आला.
या सत्काराचा व अभिनंदनाचा विनम्रपणे स्वीकार करीत व कृतज्ञता व्यक्त करीत हाच स्नेहपूर्ण जिव्हाळा, समाजबांधव व भगिनींची लाभणारी अखंडित साथ, ज्येष्ठांचे आशिर्वाद आदी बाबी आपल्या वाटचालीसाठी नवचैतन्यदायी प्रेरणादायी ठरत आहे. या शब्दात आ. सुलभा खोडके यांनी आभार व धन्यवाद व्यक्त करीत सर्वांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत मला लाभलेल्या या सहकार्या बद्दल आपण सदैव ऋणी असल्याचे सांगितले.
यावेळी शिवश्री अरविंदराव गावंडे, अश्विन चौधरी, राजेंद्र अढाऊ, संजय ठाकरे, चंद्रकांत मोहिते, प्रकाश राऊत, संजय ढोरे, सुरेंद्र आडे, बाळासाहेब मार्डीकर, अशोक कवीटकर, प्रमोद कापडे, अशोक ठाकरे, मनोज सोळंके, सोपान साबळे, रवी मोहोड, प्रमोद काळे, गजानन वानखडे, यश राऊत, प्रकाश देशमुख, अनिल टाले आदींसह अन्य पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.