संपूर्ण मानव जातीला स्वच्छता, शिक्षण व अन्य जीवन मूल्यांची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुर्तीजापुर शहरात महाव्हाईस न्यूज तर्फे १०७ सफाई कामगारांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.
ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता वर्षभर सफाई कामगार शहराच्या स्वच्छते करिता कार्यरत राहतात. ज्याकडे उच्चभ्रू समाज तिरस्काराने बघतो, असे घाण स्वच्छ करण्याचे काम हे सफाई कामगार बिन दिक्कतपणे करतात. त्या पोटी त्यांना वेतन मिळते. परंतु कितीही मोबदला देऊन जे काम समाजातील अन्य घटक करू शकणार नाहीत, ते काम हे सफाई कामगार सहजतेने करतात. सतत गलिच्छ काम केल्याने त्यांच्या स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम होतो. परंतु हे सफाई कामगार त्याची तमा बाळगित नाहीत. स्वतः अस्वच्छतेच्या पडछायेत वावरित हा घटक शहरात स्वच्छता ठेवून समाजातील अन्य घटकांच्या स्वास्थ्याची अहर्निश काळजी घेतो. परंतु समाजातील अन्य घटक सफाई कामगारांच्या या महत्त्वपूर्ण योगदान बाबत उदासीनताच प्रकट करीत आलेला आहे.
याची दखल घेऊन विश्ववंदनीय गाडगेबाबांचा संदेश समाज मनात रुजविण्याकरिता महाव्हाईस न्यूजचे मुर्तीजापुर प्रतिनिधी अर्जुन बलखंडे आणि छायाचित्रकार नरेंद्र खवले यांनी १०७ सफाई कामगारांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तीजापुर येथे होणाऱ्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सौ. सुप्रियाताई टवलारे, प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मुर्तीजापुर ह्या राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून गजानन गवई, मुख्य संपादक तथा संस्थापक अध्यक्ष महाव्हॉइस न्यूज, संजय आठवले, कार्यकारी संपादक महाव्हाईस न्यूज, श्री मिलिंद भाऊ बंदिष्टे (कोषाध्यक्ष भा.शि.मं मूर्ती,) श्री.संतोषभाऊ पाठक (सदस्य, भा.शि.मं मूर्ती,) श्री.द्वारका प्रसाद दुबे, श्री. एडवोकेट अविन अग्रवाल, श्री.आतिष महाजन, श्री.भारत जेठवाणी, श्री.संदीप सरनाईक, श्री.संजय डागा, श्री.राहुल गुल्हाने, श्री.राजू सदार , श्री.सुनील तायडे, श्री.संतोष गोलाईत, श्री.राहुल येदवर आणि लखन मिलांदे हे राहणार आहेत.