अकोला – बदलापूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ, तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी घडलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ व कारवाई करण्यात विलंब करणाऱ्या पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचा आदर ठेवून बार्शिटाकळी येथे तोंडावर काळी फीत (पट्टी) बांधून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त केला. यावेळी कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, कॅाग्रेसचे शहराध्यक्ष शोएब पठाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन मानतकर, शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश राऊत,
राष्ट्रवादी कॅाग्रेस तालुकाध्यक्ष सतिष गावंडे, राष्ट्रवादी कॅाग्रेस शहराध्यक्ष अय्याज खान, कॅाग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भूषण गायकवाड, कॅाग्रेसचे जिल्हा सचिव मासुम खान, डॅा. तनविर जमाल, पुरुषोत्तम ढोरे, भारत बोबडे, अजहर भाई, शोएब भाई, जि.प. सदस्य गणेश बोबडे, शिवसेनेचे अशोक इंगळे, नरेंद्र मते, गोविंदा ढोके, निखिल मनवर, मनोज गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.