Sunday, November 17, 2024
Homeराज्यकाँग्रेसच्या वतीने अकोला जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन...

काँग्रेसच्या वतीने अकोला जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन…

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.

अकोला जिल्हा राष्ट्रिय काँग्रेस पक्षा तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन.

अकोला – देशात कोणीही उपाशी पोटी झोपु नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, वादळीवारा, पाऊस, थंडी याचा विचार न करता, न-थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवील्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल.

शेतकरी जगेल तरच जग जगेल.परंतू केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही. हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून, या सरकारचा अकोला जिल्हा ग्रामिण व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 26 जुलै शुक्रवार रोजी आंदोलन करुन त्रिव जाहिर निषेध करण्यात आला व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी अकोला जिल्हा राष्ट्रिय काँग्रेस पार्टी यांच्या तर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री. रमेशजी बैस, यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक मानकर शहराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील,वानखडे मनपा माझी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे अनुसूचित जाती विभागाचे महेंद्र कवी त्यांचे सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: