नांदेड – महेंद्र गायकवाड
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजातील दहावी व बारावी तसेच इतर क्षेत्रातील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 9 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहील. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व युट्युब फेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे हे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजीराव कल्याणकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,
छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, आरएफओ केशव वाबळे, आरडीसी महेश वडतकर, महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
इयत्ता दहावी मध्ये 80 टक्के तसेच बारावी मध्ये 80 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच मेडिकल इंजिनिअरिंग यासह विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला आहे. 80 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका पदाधिकारी यशवंत आवळे 8390171818, राम पाटील कदम 9552808188, गोविंद पाटील ढाकणीकर 9146894415,
संजय कादम,9823100972, शिवाजी पवार 8411999901, गजानन कहाळेकर 9764169999,राजकुमार भुसारे 9527767771, दिगांबर देशमुख 9890954678, दत्ता खराटे 9970724871, संतोष कपाटे 9421226679, विकास कौडगावकर 9405994929 या मोबाईल व्हाट्सअप नंबरवर ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवावी, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.