हेमंत जाधव
सर्वोच्च न्यायालयाने अनुसुचित जाती जमाती संदर्भात अ ब क ड वर्गीकरण करण्याचे जे निर्देश दिले आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी याकरिता अण्णाभाऊ साठे सोशल फोरम युवा आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब खामगांव यांना दिनांक 30 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाचा डाटा गोळा करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी,व उपेक्षित वंचित घटकाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर,
RS ग्रुपचे अध्यक्ष विश्वजीत निंदाने श्रीराम गायकवाड, गोलु सकळकळे, करण सकळकळे, विशेष वानखडे, धनराज वानखडे, अंकुश पाटोळे, आकाश विर्शिद रोहित उज्जैनवाल आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.