गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जिल्हा भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी,व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणारे नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचे शुभारंभ,
गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम साखर कारखाना परिसर, लाखांदूर येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, नानाभाऊ पंचबुद्धे, सुनील फुंडे, विनोद ठाकरे, संजय गुजर व सत्यजित गुजर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या ऊस गाळप हंगामाचे शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नॅचरल ग्रोवर्स प्रा.लि.च्या संचालक मंडळाने केले आहे.