Sunday, September 8, 2024
spot_img
Homeखेळवसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी ओम गाडगे कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर...

वसंतराव नाईक विद्यालयाचा विद्यार्थी ओम गाडगे कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर…

पातुर – निशांत गवई

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नुकतेच प्रभात किड्स अकोला येथे आंतर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथील ओम संजय गाडगे यांने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून पातुर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर येथे वर्ग १२वी मध्ये शिकत असलेला ओम संजय गाडगे याने १९ वर्षे वय व ६१ किलो वजन गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला व त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

ओम गाडगेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे संस्थेचे संस्थापक/सचिव माननीय श्री रामसिंगजी जाधव साहेबांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्याला विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.एम.सौंदळे व क्रीडा शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. ओम संजय गाडगेच्या कुस्ती स्पर्धेतील नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरू अभिनंदन केले जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: