रामटेक – राजू कापसे
शहरातील समर्थ विद्यालय येथे शिक्षण घेणारा ओम प्रशांत बावनकर याने नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. ओम च्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ओम हा शहरातील समर्थ विद्यालयात शिक्षण घेत असुन शाळेतील शिक्षक चकोले सर व पंधरे सर तथा ओम च्या आई-वडिलांनी ओम ला वेळोवेळी व योग्य मार्गदर्शन केले होते. या सर्वांच्या मार्गदर्शनातून त्याने अथक परिश्रम घेऊन नयोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
सदर परीक्षा डिसेंबर महिन्याच्या २४ तारखेला झाली होती. संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयात प्रवेश होतो. नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत केंद्र सरकारकडून विनामूल्य शिक्षण दिले जाते.
त्या विद्यालयातील विद्यार्थी हा उत्तम दर्जाचा तयार होतो. त्याची निवड जवळपास सर्वच विभागांमध्ये होत असल्याची चर्चा ग्रामीण भागात व शहरात सुरू आहे.
नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्प खैरी या भारत सरकारच्या अनुदानातून नवोदय विद्यालय या नावाने प्रसिद्ध आहे. या विद्यालयाचा मुख्य हेतू ग्रामीण स्तरात असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना उच्च दर्जाचा विद्यार्थी तयार करणे होय.