राहुल मेस्त्री
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची नुकतीच भेट कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजु पोवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतली.यावेळी रखडलेल्या चिकोडी जिल्हा मागणीची तात्काळ अंमलबजावणी करावी. विद्युत विभागाचे खाजगीकरण झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सदरचे खाजगीकरण थांबवावे यासह विविध मागण्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्या.
सध्याची अतिवृष्टी चालू आहे. घरांच्या पडझडीसह सोयाबीन, भुईमूग,ऊस व विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा निःपक्षपाती सर्वे करून योग्य लाभार्थींना ती नुकसान भरपाई मिळावी. दुधगंगा वेदगंगा व नदीकाठावर गत वेळी उद्भवलेल्या महापूर परिस्थितीमुळे घरांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा पुन्हा एकदा नव्याने निःपक्षपाती सर्वे करून
अद्याप ज्याना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांनाही भरपाई मिळाली पाहिजे.
जिल्ह्याचे केंद्र बेळगाव हे दूरच्या असून चिकोडी जिल्ह्याची मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तात्काळ चिकोडी जिल्ह्याची अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.विद्युत विभागाचे खाजगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या शेतकरी त्यामध्ये भरडला जाणार आहे.
अशा विविध विविध विषयावर राजू पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा करून माजी मुख्यमंत्री येयुराप्पा यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून या समस्या बाबत तात्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ग्वाही दिली.सदर भेट माजी मुख्यमंत्री यांच्या कावेरी या निवासस्थानी घेण्यात आली.
याप्रसंगी चुन्नापा पुजारी, राघवेंद्र नाईक,शिवाप्पा कोलार, गंगाधर मेटी,मल्लापा अंगडी सुभाष शिरगुर. उमेश भारमल,मयुर पोवार, रोहन पाटील, विवेक पुजारी व रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.