मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकश सुर्वे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसेच दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओवर स्वतः शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली.
शीतल म्हात्रे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”