सांगली – ज्योती मोरे.
भारतीय जनता पार्टी जिल्हा सांस्कृतिक पोस्ट च्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांच्या गायनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 18 ते 30 आणि 30 पासून पुढे खुला असे दोन गट करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये 18 ते 30 वयोगटमध्ये पूजा गुरव यांनी प्रथम,स्वराली करमरकर यांनी द्वितीय तर अनुष्का अडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 30+वयोगट मध्ये प्रथम भाग्यश्री लगारे द्वितीय माधवी चौगुले तृतीय आश्विनी दांडेकर तर उत्तेजनार्थ जयश्री गुरव ज्योती तेरवाडकर यांनी क्रमांक घेतले.
योगिनी बापट वैशाली डफळापूरकर उषा आपटे मनीषा कुलकर्णी नीला मोक्ताली या 70 वय वर्ष 70 वरील स्पर्धक गायिका स्पर्धकांना वागेश्वरी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विशेष म्हणजे 70 वर्षावरील पाच महिलांनी या स्पर्धेत भाग घेऊन महिलांचा उत्साह वाढविला. स्पर्धेतील 70 वर्षावरील एका आजीने नृत्यसह गायन सादर केले करून स्पर्धेला चार चांद लावले.
विश्रामबाग येतील स्वातंत्रवीर सावरकर प्रतिष्ठान च्या सावरकर प्रशाला येथे हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांच्या हस्ते पार पडले. 69 महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पुरुष गायकांची गाणी महिलांनी गाण्याची असे स्पर्धेचे स्वरूप होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेला कार्यक्रम सायंकाळी रात्री नऊ वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ स्मृती पाटील नगरसेवक श्री शेखर इनामदार नगरसेवक असो स्वाती शिंदे क्रिडाई चे अध्यक्ष श्री रवींद्र खिलारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सौ स्मृती पाटील यांनी महिलांच्या साठी केलेल्या कार्यक्रमाचे आपल्या भाषणात खूप कौतुक केले. महिलांसाठी असे अनेक उपक्रम राबवावेत असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतः श्री राम भजन गाऊन आपल्या कलेचा गुण सर्वांसमोर सादर केला.
श्री शेखर इनामदार अड स्वाती शिंदे श्री ओमकार शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अपर्णा गोसावी नगरसेविका उर्मिला बेलवलकर नगरसेवक सविता मदने उपस्थित होत्या.
सौ रश्मी सावंत यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून काम केले.सौ माणिकताई जोशी, श्री सचिन पारेख, सौ अपर्णा पटवर्धन, श्री गोवर्धन हसाबनिस,सौ अश्विनी कदम, सौ मौसमी पटवर्धन, राजन काकिर्डे सौ अनुजा कुलकर्णी यांनी नियोजन केले.
श्री अरविंद इनामदार सौ गीता लिमये श्री अमीत शहा यांनी परीक्षक म्हणून काम केले.स्वागत प्रास्ताविक सौ अपर्णा गोसावी यांनी तर सुत्रसंचन सचिन पारेख यांनी तसेच आभार प्रदर्शन गोवर्धन हसबनिस यानी केले. स्पर्धा पाहण्यास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.