नांदेड – महेंद्र गायकवाड
होळी व धुलिवंदन तसेच हल्लाबोलच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेने एक प्रेस नोट जाहीर केली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारे कृत्य केल्यास कारवाई करणार असे या प्रेस नोटमध्ये म्हण्टले आहे.
आगामी होणा-या होळी व धूलिवंदन आणि हल्लाबोल च्या अनुषंगाने काही अनुसुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होऊ नये म्हणुन कोनीही मद्य प्राशन करुन वाहण चालविणार नाहीत तसेच ट्रीपल सिट, विदाऊट लायसेन्स भर वेगात वाहण चालवु नये जेणे करून अपघातास कारण होईल असे क्रत्ये करु नये तसेच रंगाचे फुगे फेकुन मारु नये तसे अढळल्यास गंभीर स्वरुपाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच ड्रंक ड्राव्यु च्या केसेस करण्यात येतील.
असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उप. विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक नांदेड शहर / इतवारा यांनी अहवान केले आहे.