नांदेड – महेंद्र गायकवाड
पावसाळ्याचे आगमन होत असताना हिवताप डेंगू मेंदू जोरासारख्या कीटकजन्य आजाराची साथ वाढण्याचा धोका असतो. सर्व आजार डासांपासून होत असतात. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात येतो. संपूर्ण पावसाळ्यात कीटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते नागरिकांनी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास घरामध्ये जास्त ओलावा राहणार नाही.त्यासाठी दर आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाडणे आवश्यक आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते डासान ची संख्या कमी झाल्यास हिवताप डेंगू मेंदू जर सारख्या कीटकजन्य आजारांची संख्या कमी होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा, परसबाग याची निर्मिती करावी.घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करावी. स्वच्छालयाचे सेप्टिक टॅंक हे डासाच्या उत्पत्तीचे स्थान असल्याने व्हॅट पाईपला जाळी बसवणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा, घरा सभोवतालची गटारे वाहती करण्यात यावी, सार्वजनिक सांडपाणी गटारी यांची योग्य विल्हेवाट लावली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.