Sunday, December 22, 2024
Homeराज्यओबीसी आरक्षण बचाव यात्रा उद्या पातुर शहरात...

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा उद्या पातुर शहरात…

पातूर – निशांत गवई

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा जोमात सुरू असून दिनांक 5 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता श्री शिदाजी महाराज मंगल कार्यालय पातुर येथे जाहीर सभा आयोजित केली आहे त्या अनुषंगाने पातुर शहरात जय्यत तयारी सुरू असून विविध पक्षाचे ओबीसी एससी एसटी बांधव मोठ्या प्रमाणात तयारी करताना दिसत आहेत शहराला यात्रेचे स्वरूप आले असून ठीक ठिकाणी यात्रेच्या स्वागताचे मोठे मोठे बॅनर लागले आहेत.

राजकीय वरदडीतील नेते आपला प्रभाव दाखवण्यासाठी आपापले स्वागताच्या बॅनर लावत असून पातुर शहर ओबीसी एससी एसटी बांधव मोठ्या प्रमाणात तयारी करताना दिसत असून वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी युवा कार्यकारणी महिला कार्यकारणी व सर्व सदस्य स्वागताची जय्यत तयारी करत असून बाळासाहेब आंबेडकर यांचे यात्रेची आतुरतेने वाट बघत आहेत.

दिनांक 5 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता शिदाजी महाराज मंगल कार्यालय पातुर येथे होणाऱ्या सभेसाठी सर्व एससी एसटी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ,महासचिव शरद सुरवाडे, तथा प्रसिद्धी प्रमुख दिनेश गवई यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: