राज्यात विधानसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटाच दिवस असून मात्र महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस पक्षाकडून अद्यापही काही नावांची यादी शिल्लक आहे. अकोला पश्चिम मतदार संघात आता काँग्रेसने मराठा उमेदवार अन्नपूर्णेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी अशी अकोला पच्छिमच्या जनतेची मागणी असून त्याच कारण जर काँग्रेस वरिष्ठांनी या मतदार संघात परत एकदा मुस्लिम उमेदवार दिल्यास त्याचा सरळ फायदा हा भाजप चा उमेदवारा ला होणार असल्याचे बोले जाते.अकोला पच्छिम मधील जनतेला स्थानिक उमेदवार पाहिजे असे एकंदरीत जनतेची मागणी आहे. अन्नपुर्णेश पाटील या उमेदवारा ला संधी दिल्यास संधीचे सोने होईल असे नागरिकांचे मत आहे.
याच मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारावर येथील जनता नाराज असल्याचे समजते त्यामुळे नाराज असलेली जनता आता अन्नपूर्णेश पाटील यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. तर अनेकांचा छुपा पाठींबा असल्याचे बोलले जाते. काँग्रेसने अन्नपूर्णेश पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपमधील बरीच मंडळी हे अन्नपूर्णेश पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे समजते. अकोला पच्छिम मतदारसंघात बीजेपी उमेदवारावर नाराजीचा सुर काँग्रेस पक्षाने मराठा उमेदवार दिल्याने निवडून येणार व जनतेत अन्नपुर्णेश पाटील या नावालाच पसंती आहे अन्नपूर्णेश पाटील हे आध्यात्मिक व सामाजिक कार्यातील चेहरा असून त्यांनाच पक्षाने संधी द्यावी तरच अकोला पच्छिम मतदार संघात काँग्रेस पक्षाचं खात उघडेल ही जनते मधे सर्वत्र चर्चा मुस्लिम उमेदवार दिल्यास त्याचा फायदा सरळ भाजपला होणार हे चित्र आहे.
अकोला पश्चिम मध्ये गेल्या ३० वर्षात एकही मराठी उमेदवार पक्षाने दिला नाही वस्तूस्थिती अशी आहे या भागात ६० टक्के लोक मराठी भाषिक आहेत आणि ३० टक्के लोक हिंदी आणि उर्दू हा विचार करता मराठी माणूस चा नवीन चेहरा असेल तो या भागात कायम मतदारांच्या लक्षात राहील अशा आवेशाने जर कुठल्याही पक्षाने एक उमेदवार जे मराठी भाषिक असेल आणि तो पश्चिम मतदार संघातील असेल तर त्याला अधिक मदत मतदार देण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकाही मराठा समाजाला नेतृत्व दिले नाही व एकही संधी न दिल्याने मराठा समाजाच्या लोकांमध्ये नाराजगीचा सूर असल्याचे समजते. त्यामुळे कॉंग्रेसला आता या मतदार संघात अन्नपूर्णेश पाटील यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. तरच ही जागा सुरक्षित राहणार अन्यथा….