Monday, December 23, 2024
Homeराज्यआता आत्म समर्पित नक्षलवादी झळकणार चित्रपटात बंदुका सोडून कॅमेऱ्याला जाणार सामोरे...

आता आत्म समर्पित नक्षलवादी झळकणार चित्रपटात बंदुका सोडून कॅमेऱ्याला जाणार सामोरे…

गडचिरोली – मिलिंद खोंड

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजात असलेल्या कुर्माघर प्रथेवर आधारित चित्रपटात काम करण्याची ईच्छा आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनीही व्यक्त केली आहे. त्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्या असलेल्या अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी त्यांना संधी देण्यासाठी शनिवारी नवजीवन वसाहतीत जाऊन त्यांची आडिशन घेतली.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांना मासिक पाळीदरम्यान घरात न राहता गावाच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या कुर्माघर नावाच्या झोपडीत वास्तव्य करावे लागते.

या प्रथेवर प्रकाश टाकणाऱ्या कुर्माघर नावाच्या चित्रपटाची निर्मिती गडचिरोलीत केली जात आहे. ‘अगडबम, टुरिंग टाॅकिज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवे’, अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या तृप्ती भोईर यांनी स्थानिक कलावंतांना या चित्रपटात संधी देण्याचे ठरविले.

दरम्यान आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना स्वतःची नवीन ओळख मिळावी यासाठी त्यांनाही या चित्रपटात संधी द्यावी, अशी सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केली. त्यानुसार तृप्ती भोईर व विशाल कपूर यांनी शनिवारी नवजीवन वसाहतीत जाऊन आत्मसमर्पित पुरूष व महिला नक्षलवाद्यांची आॅडिशन घेतली.

यावेळी त्यांना अभिनय व आवाजाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक सागर झाडे व अंमलदार उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: