गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) आता पाठीमागे वळून बघण्याचे दिवस संपले आता पुढे जाण्यासाठी सज्ज झालो आहोत आणि ती सुरुवात गोंदिया जिल्हयातून ‘निर्धार नवपर्वाचा’ या अभियानातून केली आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सडक अर्जुनी येथील मेळाव्यात व्यक्त केला.
गोंदिया शहरात पहिला मेळावा पार पडल्यानंतर आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या मतदारसंघात सडक अर्जुनी येथे दुसरा कार्यकर्ता मेळावा पार पडला. महाराष्ट्राचे नवे पर्व आजपासून सुरू झाले आहे. जनतेने आज ग्रामपंचायत निवडणूकीत ते दाखवून दिले ‘घड्याळ तेच वेळ नवी’ असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.
इथल्या धान उत्पादकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली केला जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. एक महिन्याच्या आत या जिल्ह्यात अदिती तटकरे व रुपालीताई चाकणकर येतील आणि महिलांचा मेळावा घेऊन प्रश्न सोडवतील असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळापर्यंत पोचावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. महायुतीचे सरकार तुमचे आमचे सरकार आहे असेही धर्मारावबाबा आत्राम म्हणाले.
आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळाले पाहिजे. माविमला बरोबर घेत जागतिक बाजारपेठ मिळवून द्यावी जेणेकरून त्या आर्थिक सक्षम आणि सबल होतील असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.
विकासाचा वादा म्हणजे अजितदादा हे आज ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेले यशच सांगत आहे असेही रुपालीताई चाकणकर म्हणाल्या. लेक माझी लाडकी ही योजना आपल्या सरकारने आणि सरकारमधील मंत्री अदिती तटकरे यांनी आणली आहे. मुलींना सक्षमपणे उभे करण्याचा हा निर्णय आहे अशी माहितीही रुपालीताई चाकणकर यांनी दिली.
या मेळाव्यात आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा मांडला. गोंदिया जिल्ह्यातील दिवसातील दुसरा कार्यकर्ता मेळावा आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या मतदारसंघातील सडक अर्जुनी येथे पार पडला.
या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सचिव व नागपूर निरीक्षक राजेंद्र जैन,
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, युवक अध्यक्ष केतन तुरकर, समाजकल्याण सभापती पूजा शेठ, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.