न्युज डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅली दरम्यान दोन, तीन वेळा रुग्णवाहिकेला रस्ता दिल्यानंतर त्यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती, तर आता राहुल गांधी यांनीही दिल्लीत भारत जोडो यात्रे दरम्यान एक रुग्णवाहिकेला रस्ता दिला आहे मात्र याचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याने हाही एक चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णवाहिकेमुळे काही काळ यात्रा अपोलो रुग्णालयाजवळ थांवविण्यात आली होती. यावेळी हजारोचा जनसमुदाय दिल्लीच्या रस्त्यावर भारत जोडो यात्रेत सामील झालाय असल्याचे चित्र दिसत आहे.
भारत जोडो यात्रेने आतापर्यंत तीन हजार किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शनिवारी सकाळी बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली. राहुल यांचा ताफाही इंडिया गेटमधून जाणार आहे. दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात वेगवेगळे थांबे असतील. पक्षाचे प्रमुख नेते, कलाकार, खेळाडू, युवकांसह सर्व वर्ग आणि समाजातील लोक आणि हजारो कार्यकर्तेही या यात्रेत सहभागी होणार आहेत.
भारत जोडो यात्रेसाठी दिल्लीत दाखल होत असताना राहुल गांधी म्हणाले होते की, काही लोक द्वेष पसरवत आहेत पण देशातील सामान्य माणूस आता प्रेमावर बोलत आहे. या यात्रेत प्रत्येक राज्यात लाखो लोक सहभागी झाले आहेत. मी आरएसएस-भाजपच्या लोकांना सांगितले आहे की, आम्ही तुमच्या द्वेषाच्या ‘बाजारात’ प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहोत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांची भारत जोडो यात्रा येथील अपोलो रुग्णालयाजवळ थांबवून रुग्णवाहिकेचा मार्ग काढला. रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी तो थोडा वेळ थांबला. त्यांनी सहप्रवाशांनाही रुग्णवाहिकेला रस्ता देण्यास सांगितले.
राजधानीतील अपोलो हॉस्पिटलजवळ सकाळी 8.30 च्या सुमारास एक रुग्णवाहिका आली. भारत जोडो यात्रेने आधीच जवळपास 3,000 किलोमीटरचे अंतर कापले आहे आणि जानेवारीच्या अखेरीस जम्मू आणि काश्मीरमध्ये संपण्यापूर्वी ती 12 राज्ये कव्हर करेल, एकूण 3,570 किलोमीटरचा प्रवास करणार.