Friday, November 15, 2024
Homeराज्यभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही १००% अनुदान मिळणार - धनंजय...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही १००% अनुदान मिळणार – धनंजय मुंडे…

100 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद, आवश्यकता वाटल्यास तरतूद वाढविणार – मुंडेंची भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीदिनी घोषणा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यांतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100% अनुदान देते.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे.

कृषिमत्र्यांनी घेतलेला निर्णय शेतकरी हिताचा::- आ. अँड आकाश फुंडकर

राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी घेतलेला हा निर्णय शेतकरी हिताचा आहे. या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या कामांना अनुदान होते परंतु खतांना नव्हते. खतांचे दर पाहता ते शेतकऱ्यांना परवडत नव्हते . त्यामुळे आता या निर्णयामुळे खते सुध्दा 100 टक्के अनुदनावर म्हणजेच मोफत मिळणार आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची व्याप्ती या निर्णयामुळे नक्कीच वाढेल असा विश्र्वास आ अँड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला. तसेच या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपुख्यमंत्री ना . देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, व कृषी मंत्री ना. धनंजयदादा मुंडे यांचे आभार सुध्दा आ अँड फुंडकर यांनी मानले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: