Monday, December 23, 2024
Homeराज्यनांदेड येथील कुख्यात गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग यास मध्यवर्ती...

नांदेड येथील कुख्यात गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग यास मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे केले स्थानबध्द…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, एमपीडीए., हद्दपारी सारख्या विविध प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाया करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,

नांदेड इतवारा उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी विविध पोलीस ठाण्यांना दिल्या असून या सूचनांचे पालन करून वजीराबाद पोलिसांनी दोन गुन्हेगारांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानबद्ध केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथील कुख्यात गुंड ईश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले रा. चिखलवाडी कॉर्नर नांदेड, मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफार बेग रा. खडकपूरा नांदेड यांचेविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कारवाही करण्यात आली.

ज्यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रस्तावाचे अवलोकनकरुन सदर गुन्हेगारांविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असल्याने सदर गुन्हेगारांना छत्रपती संभाजी नगर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.

वरीष्ठांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, आर. डी. वटाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथील अभिलेखावरील क्रियाशिल गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग, वय 34 वर्षे व्यवसाय बेकार खडकपूरा नांदेड याचा अभिलेख पाहणी केला असता त्यांचेविरुध्द बेकायदेशिररित्या स्वतः जवळ शस्त्र बाळगणे, दंगा करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे, खंडणी मागणी करणे,

खंडणी न दिल्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, साधी व गंभीर दुखापत करणे, चोरी व जबरी चोऱ्या करणे, रात्री अपरात्री चोरी करण्याचे उद्देशाने फिरणे अशा विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याचा अभिलेख आढळुन आला.

सदर गुन्हेगारांकडुन वारंवार गुन्हे घडुन नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजीक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्याने त्याचेविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबतचा अधिनियम 1981 (सुधारणा 2015) चे कलम 3 (1) (एम. पी. डी. ए ) अन्वये प्रस्ताव पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्फतीने जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नांदेड यांनी प्रस्तवाचे अवलोकन करुन यातील गुन्हेगाराविरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पाहुन त्यास नमुद कायद्यान्वये स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर याठीकाणी दाखल करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहा.पोलीस निरीक्षक आर. डी. वटाणे, पो.उपनि बालाजी किरवले, तसेच पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, अंकुश पवार, भाऊसाहेब राठोड, मेघराज पुरी, शेख ईम्रान यांनी नमुद स्थानबध्द ईसम यास ताब्यात घेऊन त्यास मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर याठीकाणी स्थानबध्द केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: