नांदेड – महेंद्र गायकवाड
नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात येईल अशी अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केली आहे.
या अधिसूचनामध्ये म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.173/2010 दिनांक 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल या अटीवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोते गृहे,
सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीचा वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल.
ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापराबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सबंधित महानगरपालिका आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारण यांची राहील.