ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीची जागा बदली केल्याचे प्रकरण…
पातुर – निशांत गवई
अकोला जिल्ह्यातील शिरला ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी निवडलेली जागा वगळून गैर कायदेशीरपणे पातुर तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथे ग्रामीण रुग्णालयाची बांधकाम सुरू केले असल्यामुळे पातुर नगर परिषद च्या माजी उपाध्यक्ष सौ वर्षा संजय बगाडे यांनी याबाबत माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिकात दाखल केल्यावरून याचिकेची दखल माननीय उच्च न्यायालयाने घेऊन अकोला जिल्हाधिकारी तथा पातुर तहसीलदार यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे आहे की पातुर नगरपरिषद च्या माजी उपाध्यक्ष सौ वर्षा बगाडे यांनी याचिका दाखल करताना म्हटले आहे की ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती शिरला ग्रामपंचायत हद्दीमध्ये होणार होती मात्र गैर कायदेशीरपणे ती निर्मिती देऊळगाव येथे होत असून यामध्ये अकोला जिल्हाधिकारी यांनी नियमाचे उल्लंघन करून ग्रामीण रुग्णालय निर्मितीची परवानगी दिली सदर बाब माजी उपाध्यक्ष सौ बगाडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना 28 नोव्हेंबर 2023 ला निवेदन दिले होते.
ज्यामध्ये नागरिकांवर अन्याय होत असल्याची बाब नमूद केली होती मात्र यावर कोणती ही कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर सौ बगाडे यांनी माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल केली माननीय उच्च न्यायालयाने दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदर याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस दिली आहे याचिका कर्त्या सौ वर्षा बगाडे यांची बाजू ऍडव्होकेट सत्यजितसिंह रघुवंशी यांनी मांडली.