Sunday, November 17, 2024
HomeMobileNothing Phone 2a सर्वात स्वस्त फोन लाँच...आजपासून फ्लॅश सेल सुरू...किमतीसह फीचर्स जाणून...

Nothing Phone 2a सर्वात स्वस्त फोन लाँच…आजपासून फ्लॅश सेल सुरू…किमतीसह फीचर्स जाणून घ्या…

Nothing Phone 2a : मंगळवारी संध्याकाळी Nothing Phone 2a भारतात लॉन्च करण्यात आला. त्याचा पहिला फ्लॅश सेल आजपासून होणार आहे. हा फोन नथिंग कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन आहे. ते फ्लिपकार्टवर विकल्या जाईल. कमी किंमत आणि उत्तम फीचर्सचा विचार करता हा फोन Realme आणि Xiaomi शी टक्कर देणार आहे. हा पारदर्शक दिसणारा फोन लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

या फोनमध्ये MediaTek 7200 अल्ट्रा चिपसेट असेल आणि भारतात या फोनची किंमत 8GB/128GB साठी 23,999 रुपयांपासून सुरू होते. 8GB/256GB मॉडेल 25,999 रुपयांना विकले जाईल तर 12GB/256GB मॉडेल 27,999 रुपयांना विकले जाईल. १२ मार्च रोजी पहिल्या सेलमध्ये फक्त ₹१९,९९९ पासून सुरू! तुम्ही फ्लिपकार्टवर फोन खरेदी करण्यासाठी पाहू शकता.

Nothing Phone 2a चे डिझाईन अद्वितीय आहे. मागील बाजूस ग्लिफ इंटरफेस असण्याची कंपनीने आधीच पुष्टी केली होती. हा फोन काळा आणि पांढरा अशा दोन रंगात उपलब्ध असेल. पारदर्शक डिझाईनसाठी ओळखला जाणारा नथिंग फोन सपाट डिस्प्ले आणि फ्लॅट एजसह येईल. याशिवाय, नवीन फोनच्या डिझाइनमध्ये मॅट फिनिश देखील आहे.

Nothing Phone 2a मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. नवीन फोनमध्ये MediaTek 7200 Ultra SoC आणि 12GB पर्यंत रॅम सपोर्ट असेल. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सर्व गरजा पूर्ण करेल.

हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल जो Nothing OS 2.5 UI वर चालण्याची शक्यता आहे. आगामी मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी असू शकते जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Nothing Phone 2a भारतात आणि जगभरात 5 मार्च रोजी लॉन्च करण्यात आला होता परंतु सोशल मीडियावर नथिंगने #THE100 ड्रॉप सेलची घोषणा केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या फ्लॅश सेलमध्ये इच्छुक ग्राहकांना फोन लॉन्च झाल्यानंतर अवघ्या एक दिवसानंतर खरेदी करण्याची संधी मिळते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: