अकोला – महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यासाठी शासनाची धडपड सुरू असून हया शासकीय योजना प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरात पोहचविण्याचे काम सुरू असून महाराष्ट्र सरकार राबवीत असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी व लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अशा जनतेच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमात सरकारी योजनांची माहिती देण्याचे काम करण्याऎवजी आ नितिन देशमुख यांनी शासकीय प्रोटोकाॅल बाजूला ठेवून आपण एखाद्या राजकीय प्रचार सभेत बोलत असल्यासारखे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणविस,अजित पवार यांच्यावर शासकीय अधिकारी यांच्या समक्ष वैयक्तिक पातळीवर जाऊन अतिशय खालच्या भाषेत घाणेरडी टिका केली हे लोकप्रतिनिधी असलेल्या आ नितिन देशमुख यांना शोभत नसल्याची टिका शिवसेना सह संपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तेव्हापासून राज्यात खोळंबून पडलेले विकासकामे गतिमान झाले आहेत त्याप्रमाणे अकोला जिल्हयात रस्त्याची अनेक विकासकामे थांबल्याने बाळापुर विधानसभा मतदारसंघातून अकोला या जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही धड रस्ता नव्हता हे बाळापुर विधानसभा मतदारसंघातील जनता ओळखून आहे.
तेव्हा आता विरोधात असणारे आ नितिन देशमुख हे सत्ताधारी गटाचे आमदार होते त्यांनी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात एकही महत्वाकांक्षी विकासाची योजना अकोला जिल्हयात सोडाच पण त्यांच्या विधानसभा मतदारसंघात खेचून आणली नाही याउलट महायुतीचे सरकार आल्यावर मोदी आवास योजना या नावाने ओबिसी साठी स्पेशल योजना शिंदे सरकारने सुरू केल्यावर या योजनेचे फुकट श्रेय घेण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केविलवाणा आटापिटा केला आहे.
मा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणविस,अजितदादा पवार यांनी जाहीर केलेल्या ओबिसी साठी मोदी आवास प्लस योजनेत हक्काचे घरकुल मिळावे म्हणून ओबिसी घटकातील गोरगरीब पात्र लाभार्थ्यानी अर्ज करणे सुरू केले असून महायुती सरकारच्या या योजनेविषयी सर्वसामान्य जनता समाधानी असल्याने व बाळापुर विधानसभा मतदारसंघात मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्ट्राचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आ नितिन देशमुख यांच्या विषयी प्रचंड असंतोष असल्याने आमदार नितिन देशमुख यांना आपला पराभव होणार याची जाणीव झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांचे मानसिक स्वस्थ ढासळल्याने त्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यत पोहचविण्याच्या व जनतेला शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी असलेल्या कार्यक्रमात राजकीय वक्तव्य करून देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर अतिशय खालच्या व्यक्तिगत पातळीवर उतरून राजकीय टिकाटिप्पणी केली असून आ नितिन देशमुख यांच्या टीकेचा शिवसेना सह संपर्क प्रमुख संदिप पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून याची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे संदिप पाटील यांनी यावेळी सांगितले!