Nobel Prize 2022 : भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉसर आणि अँटोन झिलिंगर यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आले आहे. अॅलेन अॅस्पेक्ट हे फ्रान्सचे भौतिकशास्त्रज्ञ आहेत, तर जॉन ए. क्लॉसर हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत आणि अँटोन झिलिंगर हे ऑस्ट्रियाचे शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांच्या प्रयोगांमुळे क्वांटम माहितीवर आधारित नवीन तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा झाला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.
गेल्या वर्षी सौकुरो मानाबे, क्लॉस होसेलमन आणि ज्योर्जिओ पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. जटिल भौतिक प्रणाली समजून घेण्यात अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याआधी सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना हा सन्मान देण्यात आला. मानवाच्या उत्क्रांतीच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पाबो यांनी आधुनिक मानव आणि विलुप्त प्रजातींच्या जीनोमची तुलना केली हे दर्शविण्यासाठी की ते मिश्रित होते.
त्याचबरोबर बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. या वर्षीचा (२०२२) शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार १० ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.