Saturday, December 28, 2024
Homeगुन्हेगारीमेडिकल रुग्णालयाती धक्कादायक घटना... डॉक्टरांनी व्हेंटिलेटर नसल्याचे सांगत मुलीला अंबु बॅगवर ठेवले,...

मेडिकल रुग्णालयाती धक्कादायक घटना… डॉक्टरांनी व्हेंटिलेटर नसल्याचे सांगत मुलीला अंबु बॅगवर ठेवले, मुलगी व्हीआयपी नसल्यामुळे १७ वर्षीय मुलीचा मुत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

आशीया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रूग्णाल म्हणून नागपूर मेडिकल रूग्णालयाची ओळख आहे.परंतु येथे सोय उपलब्ध असतांना रूग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाच उणीव असल्याचे या घटनेतुन पुन्हा एकदा पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजु बागेश्वर हिची प्रकूती गंभीर झाल्याने तिला १५ सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वार्ड क्र.४८ मध्ये भरती केले.

तिच्या दोन्ही कीडण्या निकामे होऊन तीला त्रास घेण्यास त्रास होत होता.तिला व्हेंटिलेटरची गरज होती.परंतू व्हेंटिलेटर गरज होती.परंतू व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अंबू बॅगवर ‘ठेवले याची माहिती सांयकाळी मेडिकल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शरद कुचेवार यांना देण्यात आली.परंतू त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देणे शक्य झाले नाही.

अखेर तीने दुपारी तीने अंबू गॅस’वरच शेवटचा श्वास घेतला मेडीकल अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांच्या माहितीनुसार मेडिकल मध्ये २२१ व्हेंटिलेटर असुन १८६ सुरू आहेत.तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही.त्यावेळी सर्व व्हेंटिलेटर रुग्ण होते याची चौकशी होणे गरजेचे आहे.वैष्णवीची प्रकूती गंभीर होती याची माहिती नातेवाईकांना दीली होती.परंतू त्यानंतरही तिच्यावर सामान्य वार्डात उपचार सुरू होते.

तिला’ आयसीयू’ मध्ये स्थालांतरीत का करण्यात आले नाही.हा प्रश्न आहे.व्हैटीलेटवर तीला ठेवण्यात आले होते.२४ तासांपेक्षा जास्त तिचे आई-वडील” अंबू बॅग”दाबून कुत्रीम श्वासोच्छ्वास देण्यात प्रयतृन करत होते.याची माहिती गुरवारी मेडिकल वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली.परंतू ती युवती “व्हीआयपी”नसल्याने तीला व्हेंटिलेटर मीळाले नाही.अखेर तीचा मुत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: