मुंबई : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या व्यक्तीने पिस्तूल कधीच चालवले नाही, तो पिस्तूल कसे अनलॉक करू शकतो, तो लोड कसा करू शकतो…असे सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले की, बंदूक लोड करण्यासाठी ताकद लागते. आरोपीने आधी गोळी झाडली असती तरी व्हॅनमध्ये उपस्थित असलेले इतर पोलिस त्याला नियंत्रित करू शकले असते, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले, ‘आरोपी शारीरिकदृष्ट्या इतका मजबूत नव्हता की व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पोलिस त्याला नियंत्रित करू शकत नव्हते… असा सवाल मा. न्यायालयाने केला आहे.
‘अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी का मारली?’
अक्षयच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यावर प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने एपीआय शिंदे याने झाडलेली गोळी आरोपीच्या शरीरावर अन्य कोणत्याही ठिकाणी झाडली असती असे सांगितले. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाने सर्व जखमी पोलिसांचे सविस्तर वैद्यकीय अहवालही मागवले आहेत. न्यायालयाने म्हटले की, ‘आम्हाला कोणावरही संशय नाही, मात्र आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागली आणि त्यातून गोळी गेली, तर ती रिकामी काडतुसे कुठे आहेत.
‘आम्हाला संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज हवेत, तळोजा कारागृहातून आरोपी बाहेर आल्यापासून, व्हॅन ज्या ठिकाणाहून गेली, सरकारी आणि खासगी ठिकाणी उपलब्ध असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज हवेत’, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
14 ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार तिच्या पालकांकडे केली होती. मुलीची चौकशी केली असता, तिच्या शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय अक्षय शिंदे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. यानंतर दोन्ही मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले असता, तेथे दोघांवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.
"This was not an encounter": Bombay High Court pulls up police for killing Badlapur sexual assault accused
— Bar and Bench (@barandbench) September 25, 2024
Read full story: https://t.co/KyrYeKPfdU pic.twitter.com/zfYBbJLWAY