Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील विश्रामबाग मध्ये कोंबडी खाद्याने भरलेला ट्रक पलटी कोणतीही जीवित हानी नाही...

सांगलीतील विश्रामबाग मध्ये कोंबडी खाद्याने भरलेला ट्रक पलटी कोणतीही जीवित हानी नाही…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील विश्रामबाग चौकात इस्लामपूरहून व्हसपेट ला जाणारा KA- 23 A 6587 क्रमांकाचा कोंबडी खाद्याने भरलेला मालवाहतूक ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पलटी झाला.या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही,मात्र सदर ट्रक विजेच्या खांबावर पडल्याने एमएसईबीचा मोठा नुकसान झाले.

ड्रायव्हरला व क्लिनरला किरकोळ मार लागला.घटनेनंतर ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला. घटनास्थळी लगेचच विश्रामबाग पोलीस दाखल झाले, दरम्यान हायड्रा ट्रेनला पाचारण करून ट्रक काढून वाहतूक सुरळीत करून पुढील कायदेशीर कारवाई करू अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: