नागपूर – शरद नागदेवे
निसर्गराजा फाउंडेशनतर्फे वृक्ष दिंडी काढून मनिष नगर – बेलतरोडी भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाउंडेशनतर्फे शेकडो पर्यावरण पूरक झाडे लावून पदुषण मुक्तीचा संदेश दिला. तसेच वृक्ष दिंडी काढून मनिष नगर भागात पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली.
पर्यावरणासाठी पोषक असलेली व ऑक्सीजनची भरपूर मात्रा असलेली पिंपळ, बकुळ, कदम, शिसम, अशोक, कडुनिंब आदी झाडे लावून “झाडे लावा झाडे जगवा” चा संदेश देण्यात आला. फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य काशिनाथ ब्राम्हणे यांचे शुभ हस्ते वृक्ष लावून शुभारंभ करण्यात आला. यानंतर वृक्ष दिंडी काढण्यात आली.
यावेळी पर्यावरण पूरक असे स्लोगनचे नारे लावण्यात आले. मनिष नगर भागात परिसरातील रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. शिवाजी ढुमने, उद्योगपती अभिजित रामटेके, डॉ. सोहन चवरे, विधीज्ञ हेमंत मेश्राम, अविनाश तोरसकर, बी.जी. भांडे, राजकुमार घुगल, पांडुरंग येवले, सुभाष नागदेवे, युवराज फुलझले, आदिनाथ शामकुवर, संजय बहादुरे, सूर्यकांत सावंकर, पी.के. मोहता, रामानुज प्रसाद, आत्माराम मेश्राम, मदन पखिड्डे, भास्कर अकुला आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपण करण्यापूर्वी सर्वांना टी शर्ट, कॅप व बॅचचे वितरण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी ढुमने यांनी केले. त्यांनी निसर्गराजा फाउंडेशन स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली.
उद्योगपती अभिजित रामटेके यांनी ज्या घरासमोर वृक्ष लावण्यात आले आहे त्या भागातील लोकांनी लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ सोहन चवरे यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.