Friday, December 27, 2024
HomeUncategorizedबेळंकी येथे डोक्यात वार करून निर्घुण खून...

बेळंकी येथे डोक्यात वार करून निर्घुण खून…

सांगली – ज्योती मोरे

मिरज तालुक्यात बेळंकी येथे खूनाच्या घटनेने झाल्याने खळबळ उडाली आहे मिरज पूर्व भागातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेळंकी ते जानराववाडी या रस्त्यावर बेळंकी येथे राहणारे सुनील आप्पासो गायकवाड वय पन्नास वर्षे यांचा बेळंकी नजीक जानरववाडी रोडवर डोक्यात दगड किंवा अवजड वस्तूने प्रहार करून निर्घुण खून केला.

असल्याची घटना उघडकीस आली आहे गुरुवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा खून करून पलायन केले आहे याबाबत हा खून वैयक्तिक वादातून झाला असल्याची घटना चर्चा घटनास्थळी रंगली होती अद्याप खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही सदर घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: