Wednesday, January 8, 2025
Homeविविधजिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने निलेश जाधव सन्मानित...

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने निलेश जाधव सन्मानित…

लोणार तालुका प्रतिनिधी
सागर पनाड

लायन्स क्लब खामगाव व धन्वंतरी चॅरिटेबल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी स्व. श्रावण बावस्कर गुरुजी स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्या जातो. 5001 ₹ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यावर्षी प्राथमिक ग्रामीण विभागातून जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावामधून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा उदनापूर पं. स. लोणार येथील शिक्षक निलेश विश्वंभर जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

1 ऑक्टोबर रोजी नगर परिषद लायन्स आय हॉस्पिटल खामगाव येथे आयोजित सन्मान सोहळ्यात लॉयन्स क्लबचे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया व GST को-ऑर्डीनेटर इंदरपालसिंह बग्गा यांचे हस्ते निलेश जाधव यांचा 5001 ₹ रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सहकुटुंब सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला लायन्स क्लब खामगाव चे सर्व टीम, डॉ. अशोक बावस्कर,डॉ.दादासाहेब कवीश्वर, तहसीलदार पाटोळे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: