अमरावती – दुर्वास रोकडे
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त श्यामकांत म्हस्के, वैशाली पाथरे, हर्षद चौधरी यांच्यासह वरीष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.