NIA Raids : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या आयएसआयएसच्या कटाशी संबंधित एका प्रकरणात छापे टाकले. एनआयए कर्नाटक आणि महाराष्ट्रात सुमारे 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील 1, पुण्यातील 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरातील 9 आणि भाईंदरमधील एका ठिकाणी छापे टाकले. भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याचा दहशतवादी संघटनेचा डाव हाणून पाडण्यासाठी एनआयए व्यापक तपास करत आहे.
याआधी एनआयएने जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात छापे टाकले होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मंगळवारी काश्मीर खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये दहशतवादविरोधी खटल्याच्या तपासाचा भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, खोऱ्यातील बारामुल्ला, गंदरबल, कुपवाडा, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
बनावट भारतीय चलनाची निर्मिती आणि नंतर प्रसार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी चार राज्यांमध्ये छापे टाकले. यावेळी बनावट नोटा, त्याचे प्रिंटिंग पेपर आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की हा छापा 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या NIA च्या तपासाचा एक भाग आहे. हे प्रकरण सीमेपलीकडून बनावट भारतीय चलनाची तस्करी करून भारतात विल्हेवाट लावण्याच्या संशयित व्यक्तींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित आहे.
एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपी राहुल तानाजी पाटील उर्फ ”जावेद”, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ ”आदित्य सिंग” आणि कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांच्याशी संबंध असलेल्या अनेक ठिकाणी शोध घेतला.
Of the total 44 locations being raided by the NIA since this morning, the agency sleuths have searched 1 place in Karnataka, 2 in Pune, 31 in Thane Rural, 9 in Thane city and 1 in Bhayandar. https://t.co/vKl7119DcV
— ANI (@ANI) December 9, 2023