News Click : काल दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल News Click वेबसाइटच्या पत्रकारांच्या घरावर छापे टाकले होते. यामध्ये वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या घरी विशेष सेलने मंगळवारी पहाटे ६.३० च्या दरम्यान धडक दिली. त्याचवेळी दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. सेल अधिकार्यांनी घटनास्थळावरून लॅपटॉप आणि मोबाईल फोनसारखे अनेक इलेक्ट्रॉनिक ताब्यात घेतल्या आहेत. वरिष्ठ अभिसार शर्मा, उर्मिलेश, परंजॉय गुहा ठाकुर्ता यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले होते. यावर अभिसार शर्मा यांनी काल काय घडलं ते सोशल मिडीयावर येवून हकीकत सांगितली.
अभिसार शर्मा यांनी फेसबुक वर आपली कालच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली पोलिस माझ्या घरी पोहोचले. माझा लॅपटॉप आणि फोन काढून घेतला आहे. याशिवाय हार्ड डिस्कचा डेटाही घेण्यात आला आहे. याशिवाय या घटनेनंतर त्यांचा पत्रकरिता कोणताही बदल होणार नाही, सरकार ला नेहमी प्रश्न करीत राहील. खाली video पाहा
अंमलबजावणी संचालनालयाचा असा विश्वास आहे की न्यूजक्लिकला चीनशी कथित संबंध असलेल्या संस्थांकडून अंदाजे 38 कोटी रुपये मिळाले आहेत. हे पैसे आठ पत्रकारांच्या पगारासाठी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच, न्यूजक्लिकशी संबंधित 10 पत्रकारांवर मंगळवारी सकाळी छापे टाकण्यात आले. अभिसार शर्मा, उर्मिलेश, परंजॉय गुहा ठाकुर्ता यांच्याशिवाय मुंबईतील कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाढ यांचा समावेश होता.