Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यनवनियुक्त ठाणेदारांचे पत्रकार संघातर्फे स्वागत; रामटेक पोलीस निरीक्षकपदी प्रशांत काळे रुजु...

नवनियुक्त ठाणेदारांचे पत्रकार संघातर्फे स्वागत; रामटेक पोलीस निरीक्षकपदी प्रशांत काळे रुजु…

रामटेक – राजु कापसे

रामटेक जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असुन रामटेक चे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांची बुट्टीबोरी येथे बदली करण्यात आली तेव्हा रामटेक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षकपदी श्री. प्रशांत काळे हे नुकतेच रुजु झाले असुन त्यांनी नुकताच येथील कार्यभार सांभाळलेला आहे.

ते यापुर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कार्यरत होते. तेव्हा आज दि. ५ फेब्रुवारीला ‘ व्हाईस ऑफ मिडीया ‘ संघटनेच्या रामटेक तालुका पत्रकार संघाकडून पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.

या दरम्यान पार पडलेल्या चर्चा – बैठकीमध्ये शहर वाहतुक व्यवस्थेवर जातीने लक्ष देण्याची मागणी पत्रकार संघाच्या सदस्यांनी ठाणेदार प्रशांत काळे यांना केली. नवथर तरुण शहरातुन सुसाट वेगाने वाहन चालवुन स्वतःसह इतरांचाही जिव धोक्यात टाकत असतात.

त्यांच्यावर अंकुश लागणे गरजेचे असल्याचे मत यावेळी संघाचे सदस्य प्रशांत येडके यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच शहर वाहतुक पोलीसाची नियुक्ती शहरात का नाही असा प्रश्न संघाचे सरचिटनीस पंकज बावनकर यांनी केला असता आमचेकडे संख्याबळ कमी असल्याचे व मी नुकताच कार्यभार सांभाळला असुन सध्या मी येथील सर्व परिस्थिती समजावुन घेत असल्याचे नविनच रुजु झालेले पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी माहिती देतांना सांगितले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु कापसे यांचेसह सरचिटनीस पंकज बावनकर, सदस्य प्रशांत येडके, सचिन चौरसिया, महेंद्र दिवटे, प्रविण गिरडकर, सुरेंद्र बिरणवार आदी. उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: