New Year Celebration : नवीन वर्ष 2024 सुरु झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात लोक आपापल्या पद्धतीने करतात, मात्र राजस्थानच्या जोधपूर पोलिसांनी नवीन वर्षात अनोखा उपक्रम राबवला. जोधपूर पोलिसांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना दूध पाजले. पोलिसांनी भामाशांच्या मदतीने शहरातील प्रमुख चौकात सर्वसामान्यांना दूध पाजले आणि नववर्ष साजरे करताना दारूचे सेवन न करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त भोपाल सिंह लखावत यांनी सांगितले की, नवीन वर्षात लोकांना दारूऐवजी दूध पिण्यास प्रवृत्त करण्यात आले. जिकडे तिकडे दुधाचे स्टॉल्स लावले होते, तिथे मोठी गर्दी दिसत होती. घटनास्थळी काही लोक बादल्या आणि किटली घेऊन दूध पिताना दिसले, त्यात ते दूध ओतून घरी घेऊन गेले.
#NewYear2024 पर जोधपुर पुलिस की अनूठी पहल, दूध पिलाकर दिन की शुरुआत, बाल्टी-केतली लेकर लाइन में दिखे लोग #JodhpurNews pic.twitter.com/twS0y4SHse
— Khushbu Goyal (@kgoyal466) January 1, 2024
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोलकात्याच्या पार्क स्ट्रीटवर जमलेल्या लोकांनी जोरदार डान्स केला. चेन्नईतही रात्री उशिरापर्यंत नववर्षाचा जल्लोष सुरू होता. लोकांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि जोरदार नाचले. कामराज सलाई आणि मरिना बीचवर लोक जल्लोषात तल्लीन झालेले दिसले.
आयटी सिटी बेंगळुरूमध्ये रविवारी नवीन वर्षाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला. हजारो लोक एमजी रोडवर जमले होते, त्यांनी मनसोक्त मजा केली आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रात्री उशिरापर्यंत नववर्षाचा जल्लोष सुरू होता.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या हजरतगंजमध्ये लोक डीजेच्या तालावर नाचताना दिसले. देशी-विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यात 2024 या वर्षाचे स्वागत शानदार फटाक्यांनी करण्यात आले. ओडिशातील भुवनेश्वर आणि कर्नाटकातील हुबळी येथेही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
हैदराबाद आणि आंध्रप्रदेशमध्ये पोलिसांनीही सर्वसामान्यांसोबत नववर्ष साजरे केले. हैदराबादचे पोलीस आयुक्त आणि आंध्र प्रदेशचे डीजीपी यांनी केक कापून सहकारी पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी झारखंडची राजधानी रांची येथील फरई लाल चौक परिसरात हजारो लोक जमले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असूनही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन जोरात सुरू होते. नववर्षानिमित्त नागपूर पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा अनोखा पुढाकार घेतला. पोलिसांनी लोकांना फुले देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.