Nikki Yadav Murder Case: दिल्लीतील निक्की यादव हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिलने चौकशीदरम्यान खुलासा केला की, ९ फेब्रुवारीच्या रात्री तो निक्की यादवसोबत अनेक तास कारमध्ये फिरत होता. त्यानंतर रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान निगमबोध घाटाजवळील पार्किंगमध्ये नेऊन तिची हत्या केली.
हत्येनंतर 10 फेब्रुवारीला साहिलने निकीच्या फोनमधील व्हॉट्सएप चॅटसह सर्व डेटा डिलीट केला. दिल्ली गुन्हे शाखा उत्तम नगर, निजामुद्दीन, काश्मिरी गेट येथील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी दिल्लीतील निक्की यादवच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, साहिल गेहलोत नावाच्या व्यक्तीने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता त्याची गर्लफ्रेंड निक्की यादवची कथितपणे हत्या केली आणि त्यानंतर 12 तासांनी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता तो पुन्हा त्याच्या कारमध्ये आला आणि मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवला. त्यानंतर रूममेटच्या हत्येने खळबळ उडाली होती.
साहिल गेहलोतच्या कुटुंबीयांना या हत्येबाबत काही माहिती होती का, याचा तपास आता दिल्ली पोलीस करत आहेत. घरच्यांना खुनाची माहिती होती का? कारण साहिलच्या म्हणण्यानुसार, साहिलच्या एंगेजमेंटनंतरच निक्कीसोबतचे त्याचे भांडण सुरू झाले होते.