नरखेड – अतुल दंढारे
कोणत्याही शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर विशिष्ट कालावधी नंतर ‘बदली’ ही नित्यनियमाने होत असते.काटोल तालुक्यात विविध विभागात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे. काटोल येथील उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांची बदली परतवाडा येथे झाली त्यांच्या ऐवजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शिवराज पडोळे यांनी ‘उपविभागीय अधिकारी’ म्हणून रुजू झालेत.
लोकप्रिय उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी बापू रोहम यांनी पदभार सांभळला.प्रभारी गट विकास अधिकारी संजय पाटील यांची वर्धा येथे बदली झाल्यामुळे डॉ.निलेश वानखडे यांनी पदभार सांभाळला.तहसीलदार अजय चरडे यांची बदली झाली त्यांच्या ऐवजी राजू गणवीर बदलून आलेत.
गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांची भिवापूर येथे बदली झाली त्यांचा चार्ज शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर यांनी स्वीकारला.पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांची बदली झाल्यामुळे अशोक कोळी यांना चार्ज देण्यात आला तर अन्न पुरवठा निरीक्षक कमलेश कुंभरे यांची समुद्रपूर येथे बदली झाली.सध्या त्यांच्याऐवजी नवीन अधिकारी रुजू व्हायचे आहे.
अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्यामुळे नवा गडी , नवा प्रशासकीय राज सध्या काटोलमध्ये सुरू आहे.जनतेच्या कामात व सेवेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये अशी सामान्य काटोलकरांची अपेक्षा आहे.