अकोला – महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाची संलग्नित अकाेला श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी प्रबोध देशपांडे, तर सचिवपदी विशाल बोरे यांची निवड झाली. पदाधिकाऱ्यांसह १५ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या अकाेला श्रमिक पत्रकार संघाच्या सभेत अनेक विषयांचा समावेश हाेता. पत्रकार संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीवरही चर्चा करण्यात आली. अध्यक्ष अजय डांगे यांनी प्रास्ताविकात संघाची भूमिका विषद केली.
सचिव आशिष गावंडे यांनी संघाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. गत वर्षाचा जमा-खर्चही सादर करण्यात आला. पुढील दाेन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्रबाेध देशपांडे तर सचिव म्हणून विशाल बाेरे यांनी निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून दिलीप ब्राम्हणे व शरद पाचपाेर, काेषाध्यक्षपदी प्रवीण ठाकरे, सहसचिव म्हणून नीलेश जाेशी व सचिन राऊत यांनी निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये करूणा भांडारकर, डाॅ. निशाली पंचगाम, सचिन देशपांडे, माणिकराव कांबळे, जीवन साेनटक्के, सुगत खाडे, अमाेल नांदुरकर, गणेश साेनाेने यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारिणीचे स्वागत पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार महेंद्र कवीश्वर यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जि.प. शाळेचे केंद्र प्रमुख शाम कुलट व नितीन बंडावार हाेते. सभेला पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला प्रामुख्याने राजेश शेगोकार, मनोज भिवगडे,
श्रीकांत जोगळेकर, पद्माकर आखरे, राजू चिमणकर, प्रवीण खेते, सागर कुटे, नीरज भांगे, रवी दामोदर, शंतनू राऊत, संजय चक्रनारायण, सुनील सावरकर आदींसह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.