Saturday, November 23, 2024
HomeMarathi News TodayNepal Plane Crash | लँडिंगच्या १० सेकंद आधीच विमान बनले आगीचा गोळा…अपघातापूर्वीचा...

Nepal Plane Crash | लँडिंगच्या १० सेकंद आधीच विमान बनले आगीचा गोळा…अपघातापूर्वीचा व्हिडिओ आला समोर…

Nepal Plane Crash: नेपाळमध्ये आज रविवारी सकाळी एक मोठा विमान अपघात झाला. कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे रविवारी सकाळी यती एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमान कोसळले. विमानात 72 लोक होते. आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच जण भारतीय देखील आहेत. या अपघातात कोणीही वाचले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

अपघातापूर्वीचा व्हिडिओ
अपघातापूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विमान छताच्या अगदी जवळून उडत आहे. विमान अचानक हवेत थरथरू लागते आणि मोठा आवाज होतो. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की लँडिंगच्या 10 सेकंद आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या.

पोखरा विमानतळाजवळ हा अपघात झाला
पोखरा विमानतळ प्राधिकरणाकडून असे सांगण्यात आले आहे की, यती एअरलाईन्सचे विमान धावपट्टीपासून अवघ्या 10 सेकंदांच्या अंतरावर होते. कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे जुना विमानतळ ते पोखरा विमानतळादरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने काठमांडूहून सकाळी 10.30 वाजता पोखरा गाठण्यासाठी उड्डाण केले.

यती एअरलाइन्सच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी नेपाळ सरकारने पाच सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. 68 प्रवाशांपैकी 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, एक आयरिश, दोन कोरियन, एक अफगाणी आणि एक फ्रेंच होता.

पोखरा विमानतळ धोकादायक मानला जातो. दोन महिन्यांपूर्वी थाई एअरवेजचे विमान कोसळले होते. या अपघातात 113 जणांचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: