Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनन भूतो न भविष्यती… प्रथमच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इतिहास "...

न भूतो न भविष्यती… प्रथमच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इतिहास ” रंगकर्मी ” नाटक समूह पॅनलचे ८ उमेदवार भरघोष बहुमताने नाट्य परिषदेवर निवडून आले…!

१६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या निवडणूक २०२३ – २०२८ घेण्यात आली आणि १९ एप्रिल २०२३ ला निकाल जाहीर करण्यात आला. रंगकर्मी नाटक समूह पॅनल चे ८ उमेदवार प्रशांत दामले , विजय केंकरे, सविता मालपेकर, सुशांत शेलार, वैजयंती आपटे,सयाजी शिंदे,अजित भुरे , विजय गोखले भरघोष बहुमताने निवडून आले.

आपलं पॅनलचे २ उमेदवार सुकन्या कुलकर्णी- मोने व प्रसाद कांबळी हे निवडून आले. ही निवडणूक खूप चुरशीची झाली, संध्याकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली ते सकाळी ५.३० पर्यन्त मतमोजणीला विराम मिळाला, मतमोजणी पूर्ण झाली आणि रंगकर्मी नाटक समूहाचे ८ उमेदवार विजयी झाले व आपलं पॅनल चे २ उमेदवार घोषित करण्यात आले, निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले की अधिकृत निकाल १९ एप्रिल २०२३ ला सर्व निकाल जाहीर करू.

आता नाट्य परिषद च्या निवडणूक मध्ये झालेल्या ६० जागा पैकी रंगकर्मी नाटक समूह पॅनलनी ५८ जागांवर विजय मिळवला आहे. अध्यक्ष पदासाठी प्रशांत दामले यांचे नाव घेतले जात आहे, मोठ्या प्रमाणात प्रशांत दामले यांना पाठिंबा मिळत आहे. आता लवकरच अध्यक्ष पदासाठी व अन्य पदासाठी अधिकृत घोषणा केली जाईल..!

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: