नागपूर – शरद नागदेवे
नागपूर- हिगंणा- मागील 25 वर्षापासून संत गमाजी महाराज शिक्षण संस्थे अंतर्गत हिंगणा येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहे अनेक विद्यार्थी घडवलेल्या या शाळेच्या एक शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा पुरवल्या गेला नागपूर जिल्हा परिषदेद्वारा (शिक्षण विभाग माध्य.) तर्फे हिंगणा तालुक्यातून नेहरू विद्यालयाला “प्रगतीशील शाळा पुरस्कार 2023” देण्यात आला.
नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकर आडबले यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते यांनी पुरस्कार स्विकारला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी सौम्या शर्मा, शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार , शिक्षणाधिकारी (माध्य.) रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार, चिंतामण वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेच्या या गौरवास्पद कामगिरी करिता संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, कोषाध्यक्ष प्रमोद बंग संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.