राज्यातील राजकारणातील दररोज बदल होताना दिसत आहे. त्यामध्ये सर्वाधिक राजकीय धक्के उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बघायला मिळाले आहेत. तर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असल्याचे समोर आले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
रविवारी 2 तारखेला दुपारचा राष्ट्रवादीच्या शपथविधी सोहळा झाला तो अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने बघितला राजकारणात काहीही घडू शकते हे अवघ्या देशाने बघितले आहे. कोण केव्हा पलटी मारणार हे सांगता येणार नाही, नीलम गोऱ्हे यांच्याबाबत अनेकवेळा अश्या अफवा ऐकायला मिळाल्या मात्र त्या फोल ठरल्या. यावेळी मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांनी शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.