Wednesday, December 4, 2024
Homeराज्यराष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे पक्षातून निलंबीत...

राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे पक्षातून निलंबीत…

बाळापूर – सुधीर कांबेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटांचे अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुक लढविल्यामुळे पक्षविरोधी भुमिका घेऊन महायुतीसरकारची प्रतिमा मलीन केली आहे.

त्यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केल्यामुळे दिनांक ८ नोंव्हेबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशध्यक्ष खासदार सुनिलजी तटकरे यांनी कृष्णा अंधारे यांना त्यांच्या जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण या पदावरुन निलंबीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी केली आहे.

कृष्णा अंधारे यांनी पक्षशिस्तभंग करुन विधानसभेत अपक्ष निवडणुक लढविली असुन त्यांची पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यावर परत कृष्णा अंधारे या व्यक्तीने महायुतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे वारंवार निर्देशनास येत असुन माहिती अंतीम असतांनाही पक्षातुन बडतर्फ केल्यावर देखील स्वःताच्या नावापुढे जिल्हाध्यक्ष पद लावत जिल्हांतील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना भासवत असल्याचे पक्षश्रेष्ठीच्या निर्दशनांस आले आहे.

ही बाब पक्षांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असुन पक्षाने यांची गंभीर दखल घेतली आहे.कृष्णा अंधारे यांच्या सद्यास्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठल्याही संबंध नाही.पक्षाच्या नावांच्या गैरवापर केल्यास फौजदारी कारवाईला संबंधित व्यक्तीला सामोरे जावे लागेल यांची नोंद अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्यांनी घ्यावी.

तसेच आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अकोला जिल्हा निरीक्षक तुकाराम अंभोरे पाटील यांनी एका पञाव्दारे कळविले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: