सरकार बचाव बजेटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध…
अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राज्याला सावत्रपणाची वागणूक दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यावर अन्याय करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि बिहार राज्याला भरीव तरतूद देत महत्त्वाच्या राज्यावर दुर्लक्ष करून केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याला सावत्रीपणाची वागणूक देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. केंद्र सरकारने सादर केलेले बजेट हे सरकार बचाव बजेट आहे महाराष्ट्रातील जनता या सरकारला कधीही माफ करणार नाही. आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख यांनी दिला आहे.
मोदी सरकार हे केवळश्रीमंताचे व व्यापाऱ्यांचे सरकार असून यांना सत्ते शिवाय काही दिसत नाही. देशाला भरभरून देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाटायला काहीच आले. नाही त्यामुळे आम्ही या बजेटचा व केंद्र सरकारचा निषेध करत असल्याच्या भावना जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी व्यक्त केल्या. यावेळी निषेध आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमरावती शहराध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, राजेंद्र चींचमलातपुरे, सय्यद मन्सूर, शहर महिला अध्यक्ष वर्षाताई भटकर, शहर युवक अध्यक्ष रोशन कडू, दिलबर शहा,वहीद खान, शुभम नागपुरे, धनंजय तोटे अविनाश ठाकरे अपंग सेल शहराध्यक्ष सचिन गजभिये. रोहित चौधरी. निलेश गणवीर, वसंत पाटील, अब्दुल मोमीन, विशाल बोरखडे, रावसाहेब वाटाणे, मनोज अरमळ, सुनील कीर्तनकार, रवी पडोळे, गौरव वाटाणे, सतीश चरपे, वेदांत उगले, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.