Monday, January 6, 2025
Homeराज्यराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सांगली शहरजिल्हा बुथ कमिटी प्रमुख पदी डॉ. शुभम...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सांगली शहरजिल्हा बुथ कमिटी प्रमुख पदी डॉ. शुभम जाधव यांची निवड…

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्हा बुथ कमिटी प्रमुख म्ह्णून पक्षाचे प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.आ जयंत पाटील यांनी निवड केली आहे.

आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुथ कमिटी बांधणी कार्यक्रम सुरू आहे त्याच अनुषंगाने सांगली शहरजिल्हा बुथ कमिटी प्रमुख म्हणून डॉ शुभम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सत्ता असो वा नसो पक्षाशी एकनिष्ठ राहुन प्रामाणिक पणे काम करत डॉ शुभम जाधव यांनी राष्ट्रवादी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांचा व पक्षातील इतर नेते पदाधिकारी यांचा विश्वास संपादन केला आहे.

राष्ट्रवादी च्या माध्यमातून डॉ. शुभम जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवून ,विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचे काम केले आहे , तसेच राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या बुथ आढावा बैठकी , ‘माझा बुथ माझी जबाबदारी , आरोग्यशिबिर,पदवीधर मतदार मोहीम , जयंत थाळी , कोविड काळात असलेले पक्षाचे उपक्रम , पूरग्रस्त मदत अश्या अनेक पक्षीय उपक्रमात डॉ शुभम जाधव हे पुढाकार घेत काम करत होते त्याचीच दखल घेत राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी त्यांना ही संधी दिली आहे.

यावेळी डॉ शुभम जाधव म्हणाले की माझ्या सारख्या सामान्य घरातील तरुणाकडे पक्षाकडून एवढी मोठी जबाबदारी ही माझ्या काम करण्याची नवी पर्वणी च आहे, मी कोणतेही महत्वाकांक्षा न ठेवता आजपर्यंत काम करत आहे व पुढेही असाच काम करत राहणार आहे, कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करणाऱ्याला पक्ष नक्कीच न्याय देतो,

माझी निवड केल्या बद्दल आमचे नेते आ.जयंत पाटील साहेब, शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांचे मी आभार मानतो ,व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून ताकतीने काम करणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागाचे बुथ प्रमुख आ.शशिकांत शिंदे व सहप्रमुख आ.अरुण लाड यांच्या व शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षातील मान्यवरांच्या सहकार्याने येणाऱ्या लोकसभा,

विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला चांगले यश मिळण्यासाठी व राष्ट्रवादी चे बुथ अजून सक्षम करण्यासाठी प्रयन्त करणार आहे, तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व जयंत पाटील साहेब यांचे पुरोगामी विचार बुथ च्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे ही डॉ.शुभम जाधव म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: