दि. ७ जानेवारी – कल्याण : ( प्रफुल्ल शेवाळे )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज वरप, कल्याण येथे पार पडला. कार्यकर्त्याना मेळाव्यात संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आश्वसनांची खैरात केली आहे..
आपल्या भाषणात काय म्हणाले अजित पवार…..
देशात ठाणे जिल्ह्यचे एक वेगळं महत्त्व आहे. ठाणे जिल्ह्यात शहरी भाग मोठा आहे.. प्रश्न अनेक आहेत.. नागरीकरण होत आहे.. राज्यात अनेक प्रश्न आहेत… आरक्षण मुद्दा आहे.. हा मुद्दा सोडवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. काही जण या साठी टोकाचं बोलतात.. मुंबई मध्ये येण्याची भाषा करतात.. अजित पवारांनी जरांगे पाटलांचा नाव न घेता त्यांना टोमणा मारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान.. आज देशाला 75 वर्ष पूर्ण झाले.. आजही घटनेचा आदर करून आपण पुढे जात आहोत.. परंतु कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही..ठाणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातील बारवी धरण आणि इतर धरणे त्यांची उंची वाढवण्याचं काम आपण या आधी केलंय. जिल्ह्यात वाहतूक कोंडी चा मोठा प्रश्न आहे.
यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोय. बैठका घेत आहोत. कोपरी ते पोटनी खाडी पूल सहा पदरी होणार आहे.. गायमुख ते भिवंडी तीन खाडी पूल, ठाणे कोस्टल रोड भाग 2 गायमुख ते फाउंटन हॉटेल रस्ता करत आहोत.. खारेगाव ते कोपरी असा साडेसात किलोमीटर रस्ता करत आहोत..
मुरबे ते सातपाटी पालघर खाडी वर नवीन पूल करत आहोत शिळफाटा ते माणकोली काँक्रेट रस्ता करत आहोत.. उल्हास नदीवर खाडी पूल, देसाई खाडी पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडण्या साठी उड्डाणपूल, कल्याण ते माणकोली बापगाव गांधारी खाडी वर चौपदरी पुलाचे काम, गांधारी ते राष्ट्रीय महामार्ग चे चौपदरी काँक्रेटी करणाचे काम, ठाणेतील दहिसर ते महापे नवीन बोगदा,
नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि पडघा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग, दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्ता रुंदीकरण काँक्रेटी करण, वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दुपदरी पूल,, अशी विकास काम, MMRDA, PWD, रस्ते विकास महामंडळ अशा विविध माद्यमातून आपण सदर कामं करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. बऱ्याच ग्रामीण भागात कचरा विलेवाट लावली जात नाही..
पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार ची साथ असावी लागते.. यासाठी असे अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सत्तेमध्ये गेलो पाहिजे…आणि या उद्देशाने आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान…
अजित पवार पुढे म्हणाले आज देशात नरेंद्र मोदीं सारखं व्यक्ती मत्त्व नाही. नरेंद्र मोदी मुळे ओळख मिळाली, देशाला मान मिळाला.. येत्या मार्च च्या पहिल्या आठवड्यात देशात आचार संहिता लागेल.. यानंतर येणाऱ्या लोकसभेत जास्तीत जास्त खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी तळागाळातील कारकर्त्यानी आप आपल्या गावातून मेहनत घ्याची आहे.
खासदार शरद पवार यांचे नाव न घेता टीका…
काही लोक राजकारणातून निवृत्त होतं नाहीत.. माणसाने वय झाल्यानंतर कुठंतरी थांबलं पाहिजे… पण काहीजण थांबत नाहीत…हट्टीपणा करतात.. .. आम्हाला संधी द्या.. कुठे चुकलो तर मार्गदर्शन करा..तेवढी धमक आमच्यात आहे.. . अशी टिपणी अजित पवार यांनी केली..
राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी मला मुंबई मध्ये थेट भेटा… तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी जरूर या.. सार्वजनिक कामं झाली पाहिजेत.. ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाटी पोलीस दलाने डोळयांत तेल घालून सामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे..
कार्यकर्त्यांनी चुकीचं कृत्य केलं नाही पाहिजे..पक्षाचं नाव खाली गेलं नाही पाहिजेत.. पक्ष शिस्तीत चालला पाहिजे.राम मंदिर बद्दल मोठा कार्यक्रम अयोध्या मध्ये होणार आहे.. सर्वांनी ज्याची त्याची श्रद्धा स्थान आहेत त्यानुसार त्यांनी त्याचा आदर केला पाहिजे.
यापूर्वी शहापूर चे विद्यमान आमदार दौलत दरोडा म्हणाले की अजित पवारांचा पहाटे चा, दुपारचा, रात्रीचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ विधी पहिला आहे..आता मात्र मुख्यमंत्री पदाचा शपथ विधी पाहायचा आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण चे राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष भरत गोंधळी यांनी कल्याण नगर महामार्ग ला शांताराम भाऊ घोलप यांचं नाव देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे.
अजित पवारांचे थाटामाटात स्वागत…
कल्याण च्या प्रवेश द्वारापासून ते कार्यक्रम स्थळी जाण्यापर्यत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेलं JCB, तसेच भले मोठे फुलांचे हार घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर सज्ज होताना दिसत होते..
सदर कार्यकर्ता मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण, शहापूर चे आमदार दौलत दरोडा, ठाणे जिल्हा समन्व्यक आनंद परांजपे, युवा नेते पार्थ पवार, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भरत गोंधळी, जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना तारमळे, शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, मुरबाड तालुका अध्यक्ष राजाभाऊ सासे, यांच्या सह हजारो कार्यकर्ते सदर मेळाव्यासाठी उपस्थित होते.